शाही दसरा महोत्सवात भद्रकाली ताराराणींच्या चरित्रा वरील महानाट्याचे सादरीकरण
दसरा चौकात जिवंत झाला करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणींचा इतिहास

कोल्हापूर – शहरातील दसरा चौकात आयोजित करण्यात आलेल्या शाही दसरा महोत्सवांतर्गत करवीर संस्थापिका 'भद्रकाली ताराराणी' या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले.पोवाडा, जिजाऊ वंदना, शिवजन्मसोहळा, राज्याभिषेक, ताराराणींची जडणघडण, छत्रपती ताराराणींचा कारभार, छत्रपती संभाजीराजांची औरंगजेबाकडून झालेली कैद, औरंगजेबा बरोबरचा छत्रपती संभाजी महाराजांचा शाब्दीक सामना या सगळ्यातून कलाकारांनी छत्रपती ताराराणींचा इतिहास जिवंत केला. या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी चांगली दाद दिली. चंद्रकांत पाटील यांनी या नाटकाची निर्मिती केलीय. ओंकार रोकडेंनी दिग्दर्शन केलंय. श्वेता सुतार यांनी छत्रपती ताराराणींची भूमिका प्रभावीपणे साकारली. शाही दसरा महोत्सव २०२५ हा केवळ उत्सव न राहता, इतिहास जागवणारा, प्रेरणा देणारा आणि संस्कृतीशी नातं दृढ करणारा ठरलाय.
या कार्यक्रमाला तहसीलदार तेजस्विनी पाटील, निवासी नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, महावीर कॉलेजचे प्राचार्य अद्वैत जोशी, सीपीआर रूग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह करवीरकर रसिक उपस्थित होते.