अभिमानास्पद : डीआरडीओकडून रेल्वे लाँचिंगवरून मिसाईल लाँच

नवी दिल्ली - डीआरडीओने रेल्वे लाँचिंगवरून मिसाईल लाँच केले आहे. या अत्याधुनिक जनरेशनच्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. त्यांनी इंटरमीडिएट रेंज अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र रेल्वेवर आधारीत मोबाईल लाँचिंग द्वारे सोडण्यात आले होते. पहिल्यांदाच विशेष डिझाईन केलेल्या रेल्वे लाँचिंगवरून अग्नी प्राईम हे मिसाईल लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळं कॅनिस्टराईड लाँच सिस्टम असलेल्या काही ठराविक देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.