सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात मौखिक तपासणी शिबिर संपन्न

कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय त्रैमासिक तंबाखू सनियंत्रण समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांच्या नेतृत्वाखाली टीमने भेट दिली.
यावेळी जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोटपा ॲक्ट 2003, व्यसनाचे, तंबाखू सेवनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, नियमित आरोग्य तपासणीचे महत्व, शिबिराचा हेतू आदीबाबत माहिती देवून उपस्थितांची मौखिक तपासणी केली. यावेळी श्रीमती कणसे व श्रीमती शिंदे यांनी समुपदेशन केले.या शिबिराचा उपस्थित कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.