खळबळजनक : मुंबईतील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न

मुंबई – आज मुंबईतील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न अज्ञाताकडून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारामुळे स्मृति स्थळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सर्व घटनेमुळे शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.