कार्यालयीन वेळेत बाहेर फिरून वेळ काढूपणा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना बसणार आता चाप...

कार्यालयाचे ओळखपत्र दर्शनी भागात लावा ; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

<p>कार्यालयीन वेळेत बाहेर फिरून वेळ काढूपणा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना बसणार आता चाप...</p>

कोल्हापूर - जे शासकीय  अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यालयाचं ओळखपत्र दर्शनी भागावर वापरणार नाहीत त्यांच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर फिरून वेळ काढूपणा करत असतात. मात्र आता शासनानं  काढलेल्या परिपत्रकामुळं  अशा कर्मचाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.

ज्या ठिकाणी नोकरी करतात  त्या कार्यालयाचं  ओळखपत्र संबंधीत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दर्शनी भागात लावणं  बंधनकारक आहे. पण अनेक कर्मचारी आणि अधिकारी ओळखपत्र न लावता स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं  कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची अडचण होते.

 नागरिकांना शासकीय कार्यालयात आल्यानंतर अधिकारी कोण आणि कर्मचारी कोण हे  ओळखून येत नव्हतं .   ओळखपत्र नसल्यानं  कर्मचारी आपले टेबल सोडून कुठं फिरत आहेत याचाही पता लागत नव्हता. त्यामुळं  शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपलं  कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासनानं परिपत्रक काढून अनेकवेळा सुचना दिल्या होत्या. तरीही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागात लावत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे  शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा 10 सप्टेंबर ला एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपलं कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावं,  अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई  करण्यात येईल असा सज्जड इशारा दिला असून अशा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना दिले आहेत.

दरम्यान शासन परिपत्रका नुसार, अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावतात की नाही.. हे पाहिले असता, काही कार्यालयामध्ये कर्मचारी नियमितपणे आपले ओळखपत्र दर्शनी भागात लावत असल्याचं दिसून आलं तर काही ठिकाणी, कार्यालयीन प्रमुखच ओळखपत्र वापरत नसल्याचं दिसून आले. यामध्ये, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कदम यांनी  ओळख पत्र दर्शनी भागात लावले नसल्याचे दिसून आले. आता त्यांच्यावर त्यांचे वरिष्ठ काय कारवाई करणार. हे पहावं  लागणार आहे.