शेंडूरमधील ओढयात आढळली सात फुट लांबीची मगर

<p>शेंडूरमधील ओढयात आढळली सात फुट लांबीची मगर</p>

कोल्हापूर - कागल तालुक्यातील शेंडूर गावच्या पूर्वेला ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी अवधूत सुतार आणि वैभव मेथे हे रात्री अकरा वाजता गेले होते. त्यावेळी त्यांना ओढ्यात मगर आढळून आली. मगर पाहताच दोघांचेही धाबे दणाणले. त्यांनी याबाबतची माहिती तातडीनं सर्पमित्रांना दिली. सर्पमित्र कृष्णात येलुगडे, पंडित मेडे आणि पोपट चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर सात फुटांची मगर पकडण्यात त्यांना यश आले. सकाळी ही मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.