राज्याचे महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी दिला राजीनामा

<p>राज्याचे महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी दिला राजीनामा</p>

मुंबई – राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पदावर दुसरी व्यक्ती रुजू होईपर्यंत ते महाधिवक्ता पदावर राहणार आहेत.
सराफ यांनी 25 वर्षे बॉम्बे उच्च न्यायालयात वकिली केली आहे. सन 2020 मध्ये सराफ यांची वरिष्ठ वकिल म्हणून नियुक्ती झाली. सहा वर्षे त्यांनी बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले आहे.
त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल आणि वादग्रस्त प्रकरणे हाताळली आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बांद्रा येथील कंगना रणौत यांच्या मालमत्तेवर केलेल्या पाडकाम कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी कंगनाची यशस्वी बाजू मांडली.