सायबर महाविदयालयात १९ आणि २० सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद

<p>सायबर महाविदयालयात १९ आणि २० सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद</p>

कोल्हापूर - सायबर महाविदयालयाच्यावतीने भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम आणि पर्यावरणीय यामधील नवकल्पना या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ आणि २० सप्टेंबर रोजी सायबर कॉलेजच्या आनंदभवन सभागृहामध्ये ही परिषद होणार आहे, अशी माहिती महाविदयालयाच्यावतीने देण्यात आली.

युनिव्हर्सिटी ऑफ वावुनिया श्रीलंका, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मॉरिशस, कादंबरी मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेत शंभरहून अधिक संशोधन पेपर सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून नवनवीन संकल्पना मांडल्या जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. बिंदू मेनन, समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दीपक भोसले, अधिष्ठाता मधुरा माने आदी उपस्थित होत्या.