आता सर्व सरकारी वेबसाईट दिसणार मराठीत...
राज्य सरकारचं मोठं पाऊल

मुंबई – सायबर गुन्हेगारांकडून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून मोठी फसवणूक होत आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व सरकारी वेबसाईट मराठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इथून पुढे सर्व सरकारी वेबसाईट मराठीत दिसणार आहेत.
सर्वच वेबसाईटमध्ये समानता असावी, असे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. आगामी १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा धोरणाचा एक भाग म्हणून प्रत्येक विभागाला हे बदल करावे लागणार आहेत. वेबसाईट मराठी असल्याने सर्व सामान्य माणसांना सरकारच्या विविध विभागांची माहिती सुलभ आणि सोप्या भाषेत कळू शकणार आहे. त्याचबरोबर सर्व सरकारी वेबसाईटमध्ये समानता असल्यास सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करून
फसवणूक करू शकणार नाहीत.