एक्सने 3 हजार 500 पोस्ट्स ब्लॉक तर 600 अकाउंट्स केलं डिलीट

<p>एक्सने 3 हजार 500 पोस्ट्स ब्लॉक तर 600 अकाउंट्स केलं डिलीट</p>

मुंबई - एलोन मस्कने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉटमुळे अश्लील कंटेंट तयार होत असल्याने एक्स वापरकर्त्यांमधून मोठी टीका होत आहे. यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आक्षेपार्ह कंटेंटबाबत एक्सला पत्र पाठवले होते. यानंतर एलोन मस्कच्या एक्सने मोठी कारवाई करत  3 हजार 500 पोस्ट्स ब्लॉक केले आहेत तर 600 अकाउंट्स डिलीट केले आहेत.
आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटला परवानगी देणार नाही आणि सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार आहे, असे एक्सने म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून एक्स वर फिरत असलेल्या अश्लील कंटेंटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक अकाउंट्स कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉटचा वापर करून अश्लील कंटेंट तयार करत होते, ज्यावर अनेकांनी टीका केली होती.