व्यसनं टाळा, आरोग्य सांभाळा : दसरा चौकातील मानवी साखळीत शालेय विद्यार्थ्यांचे आवाहन

<p>व्यसनं टाळा, आरोग्य सांभाळा : दसरा चौकातील मानवी साखळीत शालेय विद्यार्थ्यांचे आवाहन</p>

कोल्हापूर - सध्या युवा वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनतेच्या आहारी चाललाय. इतकेच नव्हे तर, शालेय विद्यार्थीही व्यसन करत आहेत. व्यसनाधिनेमुळे तरुणांना गंभीर आजार उद्भवत आहेत. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजल्यास व्यसनाधिनतेला आळा बसू शकतो, या उद्देशाने कोल्हापुरातील दसरा चौकात जनस्वास्थ्य दक्षता समितीच्यावतीने मानवी साखळीचा उपक्रम राबवण्यात आला.

 यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसन टाळा, आरोग्य सांभाळा, तंबाखूचा झटका, कॅन्सरचा फटका, दारूचा पाश, संसाराचा नाश, गांजाचा नाद, जीवन बरबाद, असे फलक हातात घेऊन जनजागृती करत घोषणा दिल्या. या मानवी साखळीत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी, लोकांना दुष्परिणांमाची जाणीव व्हावी. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ८०० शाळांमध्ये मानवी साखळीचा उपक्रम राबवल्याचे सांगितले.

१ ते ७ जानेवारी या कालावधीत राबवलेल्या जनस्वास्थ अभियानाचा समारोप व्यसनविरोधी मानवी साखळीने करण्यात आला. या मानवी साखळीत जनस्वास्थ्य दक्षता समितीचे कार्याध्यक्ष आर. वाय पाटील, एन. ए. अथणीकर, एम. बी. नदाफ, एम. एस. पाटील, व्ही. व्ही. कांबळे, व्ही. एस. पाटील, अल्लाउद्दीन बागवान, अलका देवलापूरकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.