चक्रेश्वरवाडी, बारडवाडी परिसरात गव्यांचा हैदोस...

पिकांचे मोठे नुकसान

<p>चक्रेश्वरवाडी, बारडवाडी परिसरात गव्यांचा हैदोस...</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी, बारडवाडी या गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून आपल्या शेतामध्ये विहिरी काढून पिके घेतली आहेत. परंतु यावर्षी गवारेड्याच्या तीन कळप, या परिसरात पिकांचे नुकसान करत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

गव्याच्या कळपाने शाळू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकऱ्यांकडील जनावरांचा वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे. दूध व्यवसायावर अवलंबून असलेला शेतकरी आता वैरणीसाठी अडचणीत आलाय. त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.