31 डिसेंबर साजरा करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर...राज्य सरकारने मद्यविक्रीची वेळ वाढवली...
मुंबई – ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मद्यविक्रीत मोठी सूट देत वेळ एक तासांनी वाढवली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर साजरा करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली आहे. परंतु या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार वेळेत कपात करू शकणार आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यविक्रीची दुकाने आणि बिअर बार निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार परवान्याच्या प्रकारानुसार वेळ पुढीलप्रमाणे...
एफएल- 2 (विदेशी मद्य किरकोळ विक्री): रात्री 10.30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत.
उच्च/अतिउच्च श्रेणीची एफएल- 2: रात्री 10.30 ते पहाटे १ वाजेपर्यंत.
एफएलडब्ल्यू २ आणि एफएलबीआर 2: रात्री 10.30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत.
एफएल 3 (परवाना कक्ष) आणि एफएल 4 (क्लब):
पोलीस आयुक्तालय क्षेत्र: रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत.
इतर क्षेत्र: रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत.
नमुना ई (बिअर बार) आणि ई-2: मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत.
सीएल 3 (देशी मद्य):
महानगरपालिका, 'अ' व 'ब' वर्ग नगरपालिका क्षेत्र: रात्री 11 ते पहाटे 1 वाजेपर्यंत.
इतर ठिकाणी: रात्री 10 ते पहाटे 1 वाजेपर्यंत.