के.एम.टी.उपक्रमाचे संस्थापक श्रीपतराव बोंद्रे यांची जयंती महानगरपालिका परिवहन विभागाकडून साजरी
कोल्हापूर - महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने के.एम.टी. उपक्रमाचे संस्थापक माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांची जयंती शास्त्रीनगर येथील मुख्य यंत्रशाळेत साजरी करण्यात आली . यावेळी श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मॅकेनिकल सुपरवायझर रणधीर मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील, जयवंत कुंभार, नंदकुमार सातपुते, अर्जुन चौगुले, रफिक बागवान तसेच यंत्रशाळेकडील कर्मचारी उपस्थित होते.
तसेच के.एम.टी.च्या शाहू क्लॉथ मार्केट येथील प्रधान कार्यालयातील श्रीपतराव बोंद्रे यांच्या तैलचित्रास सहा.वाहतूक निरिक्षक संग्रामसिंह काशिद यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जयदेव शिंदे, शिवराज शिंदे, अंकुश कांबळे, आनंदा आडके, प्रकाश कोळेकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते