इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द... 

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे हाल

<p>इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द... </p>

नवी दिल्ली - विमानांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे इंडिगो एअरलाईनला देशभरातून ६०० हून अधिक होणारी उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसह देशातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्याने  देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.
सलग चौथ्या दिवशी कंपनी गंभीर ऑपरेशनल समस्यांशी झुंजत असल्याने, आज ५ डिसेंबर रोजी दिल्लीतून होणारी त्यांची सर्व देशांतर्गत उड्डाणे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या मागील दिवसांपेक्षाही जास्त असल्याने, प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.