बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना धक्क्यावर धक्के...फाशीच्या शिक्षेनंतर आता २१ वर्ष...

<p>बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना धक्क्यावर धक्के...फाशीच्या शिक्षेनंतर आता २१ वर्ष...</p>

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हा धक्का पचवत असतानाच त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 
बांगलादेशातील एका न्यायालयाने शेख हसीना यांना कथित तीन भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.