माजी पंतप्रधान इम्रान खानच्या निधनाच्या बातमीबाबत तुरुंग प्रशासनाचा मोठा खुलासा...
नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या आरोपाखाली गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याच्या अफवेमूळे पाकिस्तानात गोंधळ उडाला. यानंतर पाकिस्तानातील इम्रान खानचे समर्थक तुरुंगाबाहेर मोठी गर्दी करून गोंधळ घालू लागले. यावर तुरुंग प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे.
तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे की, "इम्रान यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवा निराधार आहेत आणि त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत मिळत आहे. इम्रान खान यांना आदियाला तुरुंगातून कुठेही हलवण्यात आलेले नाही. त्यांच्याबाबतच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. ते पूर्णपणे निरोगी आहेत”