परदेशात झाला ज्वालामुखीचा उद्रेक अन् त्याचा परिणाम भारतीय विमानांवर...
विमान कंपन्यांना कडक सूचना जारी
मुंबई – दोन दिवसांपूर्वी इथिओपिया देशात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आणि त्याचा परिणाम आपल्या भारतीय विमानांच्या उड्डाणांवर झाला आहे. अनेक विमानांची उड्डाणे टाळावी, असे भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे.
इथिओपियात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख आणि सल्फर डायऑक्साइडचा मोठा लोट आकाशात पसरला आहे. हीच राख आता भारतातील दिल्ली आणि मुंबईत पोहोचली आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सर्व विमान कंपन्यांना, ‘ज्वालामुखीची राख असलेल्या क्षेत्रांवरून उड्डाणे टाळावी’, अशा कडक सूचना दिल्या आहेत.