छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला २४ नोव्हेंबर पासून प्रारंभ

<p>छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला २४ नोव्हेंबर पासून प्रारंभ</p>

 

कोल्हापुरातील एनसीसी गट मुख्यालयाच्यावतीनं पन्हाळगड ते विशाळगड या ऐतिहासिक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात येते. यंदा २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत या पदभ्रमंती मोहीमेचं आयोजन करण्यात आलंय. या मोहिमेत बारा राज्यातील एनसीसीचे छात्रसैनिक सहभागी होणार असून त्यांच्या चार तुकड्या असणारयत. त्यातील एक तुकडी मुलींची तर तीन तुकड्या मुलांच्या आहेत. प्रत्येक तुकडीत २६० छात्रसैनिक सहभागी असणारयत सहभागी छात्रसैनिकांना इतिहासापासून प्रेरणा मिळावी, त्यांच्या मध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावं तत्कालीन कालखंडात सैन्यदलाला कोणत्या अडचणी आल्या याची माहिती त्यांना व्हावी. या उद्देशानं ही मोहीम आखण्यात आल्याचं ग्रुप कमांडर ब्रिगेडियर पैठणकर यांनी सांगितलं

या मोहिमेतील मुलांच्या तुकडीला अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र संचालनालय, एनसीसीचे मेजर जनरल विवेक त्यागी तर मुलींच्या तुकडीला खासदार शाहू महाराज छत्रपती हे हिरवा झेंडा दाखवणारयत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या देशभरातील छात्रसैनिकांना महाराष्ट्राच्या संस्कृती तसंच ऐतिहासिक कालखंडाची ओळख व्हायला मदत होणारय असा विश्वास पैठणकर यांनी व्यक्त केला.

यावेळी डेप्युटी कर्नल, अनुप रामचंद्रन, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आदी उपस्थित होते.