बांगलादेशात भूकंप : दहा मजली इमारत चक्क एका बाजूला झुकली...भूकंपात अनेकांचा मृत्यू
नवी दिल्ली – बांगलादेशात मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपात सहा जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.या भूकंपावेळी दहा मजली इमारत चक्क एका बाजूला झुकली आहे.
यावेळी बहुमजली इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांची चेंगराचेंगरी झाली . यामध्ये त्यामुळे 150 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत.या भूकंपामुळं बांगलादेशात सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला हाये.