दुबईत भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळलं...
नवी दिल्ली – आज दुपारी अचानक दुबईत भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळले आहे. प्रात्यक्षिकादरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
विमान हवेत प्रात्यक्षिक सादर करत असताना अचानक नियंत्रण सुटल्यासारखे दिसले आणि काही क्षणांतच विमान जमिनीवर आदळले आहे अपघातानंतर लगेचच आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे.