भारताने आश्रय दिलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा..!
नवी दिल्ली – बांगलादेशातील हिंसक आंदोलन प्रकरणी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला होता. तेव्हा भारताने त्यांना आश्रय दिला होता. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने हसीना यांना आंदोलन प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
2024 साली बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू होता, 2024 च्या या आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.