‘एक महिला दोन मतदान केंद्रांवर 223 वेळा दिसली’ : हरियाणा निवडणुकीवरून राहुल गांधींकडून आयोगावर प्रश्नांचा भडीमार
नवी दिली – आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून, ‘एक महिला दोन मतदान केंद्रांवर 223 वेळा दिसते. निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावे की ही महिला इतक्या वेळा का दिसली’, असे म्हणत आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर सवालांचा भडीमार केला.
ब्राझील माॅडेलने हरियाणात 10 वेळा मतदान केल्याचे राहुल गांधी यांनी सादरीकरणात दाखवून दिले. स्क्रीनवर सादरीकरण देत राहुल म्हणाले की, "एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे दाखवले होते. सर्व पोल हे भाकीत करत होते, पण असे काय झाले की हरियाणामध्ये पहिल्यांदाच पोस्टल मत आणि प्रत्यक्ष मतांमध्ये तफावत दिसून आली?, आम्ही तपशीलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला जे आढळले त्यावर आम्हाला विश्वास बसत नव्हता. मी माझ्या टीमला अनेक वेळा त्याची उलटतपासणी करण्यास सांगितले. आम्ही जे पाहिले ते डेटासह 100 टक्के सिद्ध करू. तरुणांसाठी हे महत्त्वाचे आहे कारण त्यांची मते चोरीला जात आहेत. एकाच महिलेचा फोटो अनेक ठिकाणी दिसतो. काही लोकांचे वय त्यांच्या फोटोंपेक्षा वेगळे असते हरियाणात अशी हजारो उदाहरणे आहेत. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर कोणालाही कळणार नाही.