सोनम वांगचुक यांची सुटका नाहीच...
२९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी केली तहकूब

नवी दिल्ली – शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
न्यायालयात वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी वांगचुक यांच्या पत्नीची बाजू मांडली. त्यांनी याचिकेत सुधारणा करायची आहे, असे सर्वोच्च न्यायालयास सांगितले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.