'व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी' ला यंदाचा शांतता नोबेल पुरस्कार जाहीर

<p>'व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी' ला यंदाचा शांतता नोबेल पुरस्कार जाहीर</p>

नवी दिल्ली – व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना माचाडो या 'आयर्न लेडी'ला २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या त्या भूमिगत आहेत.
 व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या कामामुळे त्यांना 'व्हेनेझुएलाची आयर्न लेडी' म्हणतात. यापूर्वी त्यांचे नाव टाइम मासिकाच्या '२०२५ च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्ती' च्या यादीतही समाविष्ट होते.