लेहमध्ये हिंसक आंदोलन : पोलिसांच्या गाड्यांसह भाजपाचे कार्यालय पेटवले 

<p>लेहमध्ये हिंसक आंदोलन : पोलिसांच्या गाड्यांसह भाजपाचे कार्यालय पेटवले </p>

लडाख – केंद्रशासित असलेल्या लडाख राज्यातील लेहमध्ये विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. हा संघर्ष हिंसक आंदोलनात मिसळला आहे. 
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते.  सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांची मोठी झटापट झाली असून दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थांनी पोलिसांच्या गाड्यांसह भाजपाचे कार्यालय पेटवल्याची माहीती समोर येत आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला जात आहे.