इराण – इस्त्रायल युद्ध सुरु असताना इराण पुन्हा हादरलं...
4.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के...
नवी दिल्ली – सध्या इराण – इस्त्रायलमध्ये मोठे युद्ध सुरु असताना इराणला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. 4.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोल होते. हा भूकंप गराश या भागात जाणवला आहे. गराश हे फार्स प्रांत मध्ये स्थित शहर असून ते Gerash County चे मुख्यालय आहे. हे दक्षिण इराणमधील लारेस्तान प्रदेशाचा भाग आहे.
युद्धाच्या काळात हा भूकंप झाल्यामुळे काही तज्ज्ञ संशय व्यक्त करत आहेत. काहींच्या मते, इराण आपली अणुशक्ती दाखवण्यासाठी अणुचाचणी करू शकतो आणि त्यामुळेच हा भूकंप झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.