सातार्याला ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद; अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

सातारा – यंदाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातार्यात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘पानिपत, झाडाझडती, रणांगण, चंद्रमुखी’ यांसारख्या असामान्य आणि लोकप्रिय कादंबऱ्यांमधून इतिहास, राजकारण आणि मानवी भावभावनांचे चित्रण करणारे विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय लेखक आहेत. त्यांची अध्यक्षपदासाठी झालेली निवड ही साहित्यविश्वासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे. सातार्यात होणारे हे संमेलन साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिकांसाठी पर्वणी ठरणार असून, येत्या काळात संमेलनाच्या तारखा, प्रमुख कार्यक्रम व इतर तपशील जाहीर होणार आहेत.