रूग्णांना मिळाला दिलासा...सीपीआरनं दिवाळीत दिली आरोग्य सेवा

कोल्हापूर - छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी दिवाळी असली तरी सीपीआर मधील बाहय रुग्ण विभाग सुरू ठेवण्यात आला होता. शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी सीपीआर मधील उपचारांचा लाभ घेतला.
सकाळपासूनच रुग्णांनी सीपीआर मधील केस पेपर विभागात गर्दी केली होती. या रूग्णांनी ब्राह्यरुग्ण विभागातील डॉक्टरांना भेटून योग्य ते औषधोपचार करून घेत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. सीपीआर मधील मोफतऔषध सुविधा केंद्रही आज सुरु होतं. दिवसभरात बाह्य रुग्ण विभागात तीनशेहून अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. दिवाळी निमित्त उद्या आणि गुरुवारी सीपीआर मधील बाह्य रुग्ण विभाग बंद राहणार आहे.