जागतिक आरोग्य संघटनेने जारी केली अन्न सुरक्षेची 'पाच मुख्य सूत्रे'

मुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने ट्वीट करून अन्न सुरक्षेची 'पाच मुख्य सूत्रे' सांगितली आहेत. तसेच जीवाणू, विषाणू, परजीवी किंवा जड धातूंसारख्या रासायनिक पदार्थांनी दूषित झालेले अन्न खाल्ल्यास २०० हून अधिक प्रकारचे रोग होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे.
असुरक्षित अन्न केवळ तात्पुरता त्रास देत नाही, तर त्याचे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे अन्न सुरक्षित ठेवणे आणि त्याचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्नजन्य आजारांपासून वाचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अन्न सुरक्षेची 'पाच मुख्य सूत्रे' सांगितली आहेत.
1. स्वच्छता राखा
२. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवा
३. अन्न व्यवस्थित शिजवा
४. अन्न सुरक्षित तापमानावर ठेवा
५. सुरक्षित पाणी आणि कच्चा माल वापरा