तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर – ‘आजचे तरुण हे देशाचे भविष्य आहे. ते निरोगी व सदृढ राहणे आवश्यक आहे त्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे’ , असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. जिल्हास्तरीय “तंबाखू मुक्त युवा अभियाना’चा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, आपल्या समाजातील युवा पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण खूप वाढत आहे ही मोठी चिंतेची बाब आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या राज्यातील जास्तीत जास्त शाळा आणि गावं तंबाखू मुक्त होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा नोडल ऑफिसर डॉ व्ही ए आरळेकर यांनी प्रास्ताविक करत जिल्हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष च्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोटपा ऐक्ट २००३ , तंबाखू मुक्त शाळा ,गाव, याची माहिती देऊन तंबाखू मुक्तीची शपथ उपस्थिताना दिली.
यावेळी दंत शल्य चिकित्सक डॉ वृषाली खोत, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ अमोल पाटील, डॉ आनंद वर्धन, डॉ राजेंद्र शेटे , युवक-युवती, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.