बालकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप देवू नये...

राज्यातील औषध विक्रेत्यांना सरकारकडून विशेष सूचना 

<p>बालकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप देवू नये...</p>

मुंबई – मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात कफ सिरप या औषधामुळे लहान मुलांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. 
त्यानुसार राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना, लहान मुलांसाठी असलेल्या कफ सिरप या औषधाची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचे उल्लंघन झाल्यास औषध विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.