चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटरची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
डॉ. विलास अनंत पाटील अध्यक्षपदी, नव्या कार्यकारिणीची निवड

चंदगड : चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटरची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मजरे कार्वे येथील मेडिकल हॉलमध्ये प्रेरणादायी वातावरणात पार पडली. डॉ. विलास शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला तालुक्यातील अनेक मान्यवर डॉक्टरांची उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. विलास अनंत पाटील यांची 2025-26 या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच, डॉ. सतीश पाटील यांची उपाध्यक्ष, आणि डॉ. गुंडूराव पाटील यांची सचिव म्हणून नियुक्ती झाली.
संस्थापक मार्गदर्शक डॉ. विलास शंकर पाटील यांनी 2011 साली या डायग्नोस्टिक सेंटरची स्थापना वरिष्ठ डॉक्टरांच्या संकल्पनेतून आणि त्यागातून झाल्याची आठवण करून दिली. तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी ही सेवा अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
➡️नवी कार्यकारिणी जाहीर:-
अध्यक्ष: डॉ. विलास अनंत पाटील
उपाध्यक्ष: डॉ. सतीश पाटील
सचिव: डॉ. गुंडूराव पाटील
➡️संचालक मंडळ:-
डॉ. शिवाजी पाटील
डॉ. प्रकाश बांदिवडेकर
डॉ. दयानंद बेनके
डॉ. संदीप वाघराळे
डॉ. गणपती पाटील
डॉ. संदीप पाटील
डॉ. बाळासाहेब बेनके
डॉ. विजय गावडे
सल्लागार समिती:
डॉ. विलास शंकर पाटील
डॉ. आर. एन. गावडे
डॉ. परशराम पाटील
डॉ. एकनाथ पाटील
डॉ. सी. बी. पाटील
डॉ. संजीव पाटील
डॉ. अर्जुन हंन्नूरकर
डॉ. नितीन घोळबा