उद्याचा ‘नशामुक्त रन’ उपक्रम 12 ऑक्टोबरला होणार... 

<p>उद्याचा ‘नशामुक्त रन’ उपक्रम 12 ऑक्टोबरला होणार... </p>

कोल्हापूर -  सध्या नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा पंधरवडा सुरु आहे. परंतु जिल्ह्याला पावसाचा ऑरेज अलर्ट दिला असल्याने उद्या होणारा रन/ वॉक उपक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. हा रन/ वॉक उपक्रम रविवार, 12 ऑक्टोबर रोजी, सकाळी 6 वाजता कोल्हापूर शहरातील पोलिस परेड ग्राऊंडमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरुक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत 12 ऑक्टोबरला ‘रन अँड वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे.  संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉक मधून सहभागी होत हजारो नागरिक नशाविरोधी संदेश देणार आहेत.