सीपीआरमध्ये हिमालया बेबी केअर कडून शिशु आहार केंद्र सुरु

कोल्हापूर - कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये लहान बालकांसाठी आणि स्तनदा मातांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा सुरु करण्यात आलीय. मुंबईस्थित हिमालया बेबी केअर या कंपनीकडून रुग्णालयाला दोन शिशु आहार केंद्र देणगी स्वरूपात सुरु करण्यात आली असून, यामुळे स्तनदा मातांना दिलासा मिळणारय.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये दररोज कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या अनेक स्त्री रुग्णांना आणि महिला नातेवाईकांना लहान मुलांना स्तनपान किंवा खाऊ घालणे, डायपर बदलणे यासारख्या मूलभूत गोष्टी करायला अडचणी येत होत्या. ही गरज ओळखून हिमालया बेबी केअर कंपनीने पुढाकार घेत, दोन ‘फिडिंग पॉड्स’ म्हणजेच शिशु आहार केंद्रांची सुविधा रुग्णालयाला सुरु केलीय. या शिशु आहार केंद्राचे उद्घाटन नुकतेच शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे, शशिकांत रावळ, बाजीराव आपटे, केदार ढेकणे, महेंद्र चव्हाण, सुनिता जाधव, रोहिणी गांगुर्डे यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.