कुरुंदवाडमध्ये भटक्या कुत्र्याचा ६ वर्षांच्या मुलावर हल्ला...मुलगा गंभीर जखमी... उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन 

<p>कुरुंदवाडमध्ये भटक्या कुत्र्याचा ६ वर्षांच्या मुलावर हल्ला...मुलगा गंभीर जखमी... उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन </p>

कोल्हापूर – कुरुंदवाड शहरामध्ये भटक्या कुत्र्याने ६ वर्षांच्या उमेर मुजम्मिल बागवान याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या गालाला कुत्र्याने  चावा घेतला आहे. त्याच्या उपचाराला २ लाखापर्यंत खर्च येणार असल्याने त्याच्या कुटुंबियांकडून मदतीचे आवाहन केले जात आहे.   

हा हल्ला कुरुंदवाडमधील शिवशंकर वसाहत परिसरात गुरुवारी सायंकाळी झाला. सहा वर्षीय उमेर मुजम्मिल बागवान हा आपल्या मित्रांसोबत सायकलने खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने उमेरच्या गालाचा चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
जखमी उमेरला तातडीने उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . मात्र जखमीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या उपचारांसाठी सुमारे २ लाख रुपये पर्यंतचा खर्च येणार आहे. परंतु उमेरचे  वडील हयात नसून त्याची परिस्थिती खूप गरिबीची  आहे.  त्यामुळे उमेरच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.