गृहकर्जाचे व्याजदर कमी होण्याची शक्यता... 

नवा रेपो रेट जाहीर

<p>गृहकर्जाचे व्याजदर कमी होण्याची शक्यता... </p>

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज नवीन रेपो रेट जाहीर केला आहे. त्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात करत तो रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
२५ बेसिस पॉइंट्स कपातमुळे गृहकर्जाचे व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने अनेक बँकांनी त्यांच्या बेंचमार्क-लिंक्ड कर्ज दरांमध्ये कपात करण्याची घोषणा आधीच केली आहे. त्यानुसार  नवीन कर्जदार आणि फ्लोटिंग रेट गृहकर्ज असलेले कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना रेपो रेट कपातीचा फायदा होणार आहे.