अनिल अंबानींना दणका : आतापर्यंत ९००० कोटी रुपये केले जप्त...
मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी यांना धक्क्यावर धक्के बसत आहे. ईडीने नुकताच मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांची १,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे हा जप्तीचा आकडा ९,००० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
येस बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान, 'आरएचएफएल'मध्ये २,९६५ कोटी रुपये आणि 'आयएफसीएल'मध्ये २,०४५ कोटी रुपये गुंतवले. नंतर ही गुंतवणूक निष्क्रिय झाली. डिसेंबर २०१९ पर्यंत 'आरएचएफएल'साठी १,३५३.५० कोटी रुपये आणि 'आयएफसीएल'कडून१,९८४ कोटी रुपये थकित राहिली.