फक्त ‘या’ चार बँका देशात कार्यरत राहणार तर इतर बँका होणार विलीन..?  

सरकार बँकिंग क्षेत्रात मोठा बदल करणार... 

<p>फक्त ‘या’ चार बँका देशात कार्यरत राहणार तर इतर बँका होणार विलीन..?  </p>

नवी दिल्ली – देशात सरकारी बँकांची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे त्यासाठी नीती आयोगाने सरकारला मोठा सल्ला दिला आहे. ज्यामुळे देशातील इतर बँका चार महत्वाच्या बँकेत विलीन होण्याची शक्यता आहे. 
देशात सध्या 12 सरकारी बँका कार्यरत आहेत, नीती आयोगाने दिलेल्या सल्ल्यानुसार बँकिंग क्षेत्रात बदल केल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि केनरा बँक या चार बँका स्वतंत्र राहतील आणि इतर सर्व बँका या मोठ्या बँकांमध्ये विलीन होऊ शकतात. लहान बँकांचे विलीनीकरण करावे किंवा त्यांचे खासगीकरण करावे, असेही आयोगाने या पूर्वीही म्हटले होते.
त्यानुसार वित्त मंत्रालयाकडून प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होवू शकते. या निर्णयामुळे पुढील काळात देशात काहीच बँका दिसण्याची शक्यता आहे.