शेअर बाजारात ८०० अंकाची पडझड...

मुंबई – आज गुरुवारी शेअर बाजारात ८०० अंकाची पडझड झाली. सेन्सेक्स त्याच्या दिवसातील उच्चांकावरून ८०० अंकांनी घसरून ८४५५६.४० वर स्थिरावला, तर निफ्टी घसरून २५८८८.९० पर्यंत खाली आला.
इटरनल, इंटरग्लोब एव्हिएशन, आयशर मोटर्स, भारती एअरटेल आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसभराच्या व्यवहारात त्यांच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत घट झाली.