लाडकी बहिण योजनेत मोठा घोळ : तब्बल 12 हजार 431 पुरुषांनी घेतला लाभ...
माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड

मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झाला आहे. या योजनेतून तब्बल 12 हजार 431 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून समोर आला आहे.
याबाबत महिला व बालविकास विभागाच्या अधिका-यांनी पुष्टी केली आहे. तपासानंतर या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली असून त्यांच्या सोबत 77 हजार 980 महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या बोगस लाभार्थ्यांनी 164 कोटी रुपये उकळलेत. सध्या या योजनेतून 2 कोटी 41लाख महिला लाभ घेत आहेत. ज्यातून सरकारी तिजोरीवर 3 हजार 400 कोटींचा आर्थिक भार पडत आहे.