गृह-वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे राहणार...

रिझर्व्ह बँकेकडून सलग दुसऱ्यांदा रेपो रेट 'जैसे थे'

 

<p>गृह-वाहन कर्जाचे हप्ते जैसे थे राहणार...</p>

मुंबई  - २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत रेपो रेट ५ पूर्णाक ५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज  १ ऑक्टोबर रोजी याची घोषणा केली.

महागाई कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले आहे. रेपो रेट कायम ठेवल्याने गृह, वाहन, वैयक्तिक आणि इतर प्रकारच्या कर्जाचे हप्ते जैसे थे राहणार आहेत. सर्वसामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यावर यामुळे कोणताही बदल होणार नाही.