रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : दसऱ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर 

<p>रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : दसऱ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर </p>

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनससंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे दसऱ्याच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यात आली आहे. 
या निर्णयाचा थेट फायदा 11.5 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार असून, बोनसची ही वाढीव रक्कम थेट कर्मचाऱ्य़ांच्या खात्यात लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. रेल्वेतील विविध विभागांमध्ये आणि श्रेणीनुसार काम करणाऱ्या ट्रॅक मॅनेजर, लोको पायलट, ट्रॅक मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉईंट्समॅन, मिनिस्ट्रीअल स्टाफ आणि इतर क श्रेणीतील कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.