देशात 1 हजार 688 अतिश्रीमंत व्यक्ती असल्याचा अहवाल आला समोर...
उद्योगपतींच्या संपत्तीत 400 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली – भारतात 1 हजार 688 अतिश्रीमंत व्यक्ती आहेत. या लोकांकडे 166 लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अहवाल Centre for Financial Accountability ने दिला आहे.
Centre for Financial Accountability ने नुकतेच ‘Wealth Tracker India 2026’ चा अहवाल जाहीर केला आहे. हा अहवाल ‘Tax the Top’ मोहिमेअंतर्गत राबवला गेला आहे. या अहवालानुसार, देशातील टॉप 1 टक्के लोकांकडे 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे तर खालच्या 50 टक्के लोकांकडे उत्पन्नाच्या फक्त 15 टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. या अहवालामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत असल्याचे समोर आले आहे.
देशातील प्रमुख उद्योगपतींच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी, गौतम अदानी, सावित्री जिंदाल, सुनील मित्तल आणि शिव नाडार या उद्योगपतींच्या एकत्रित संपत्तीत 2019 ते 2025 दरम्यान तब्बल 400 टक्क्यांची वाढ झाली आहे.