लाडकी बहीणीच्या हप्त्याला झटका : संक्रांतीच्या मुहूर्ताला हप्ता होणार नाही जमा...  

<p>लाडकी बहीणीच्या हप्त्याला झटका : संक्रांतीच्या मुहूर्ताला हप्ता होणार नाही जमा...  </p>

मुंबई – महानगरपालिका निवडणुकींच्या प्रचारा दरम्यान ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा दोन महिन्याचा हप्ता संक्रांतीच्या मुहूर्तावर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार असल्याचे आश्वास दिले जात आहे. परंतु या आश्वासनाला निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा आगाऊ हप्ता देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला आहे. आयोगाने सरकारला सांगितले की, सध्या केवळ नियमित किंवा आधी प्रलंबित असलेली रक्कमच देता येईल. मतदानापूर्वी पुढील महिन्याचा लाभ देणे हा आचारसंहितेचा भंग आहे.
संक्रांतीच्या मुहूर्तावर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये, म्हणजे एकूण 3 हजार रुपये एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार सरकारकडून सुरू होता. मात्र, विरोधकांनी यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांकडून सविस्तर अहवाल मागवला आणि  निवडणुकीच्या  पार्श्वभूमी आणि आदर्श आचारसंहिता लक्षात घेता, आगाऊ पैसे देण्यास बंदी घालण्यात आली आहे.