‘ईठा’ चित्रपटाच्या सेटवर अपघात – श्रद्धा कपूर जखमी

<p>‘ईठा’ चित्रपटाच्या सेटवर अपघात – श्रद्धा कपूर जखमी</p>

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून सध्या नाशिकजवळ शूटिंग सुरू आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटासाठी श्रद्धा प्रचंड मेहनत घेत आहे. लावणी नृत्याचे जलद गतीचे स्टेप्स करताना तिचा तोल जाऊन डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

नऊवारी साडी, जड दागिने आणि कमरपट्टा परिधान करून नृत्य सादर करताना हा अपघात झाला. भूमिकेसाठी श्रद्धाने १५ किलो वजनही वाढवले आहे. सध्या श्रद्धा मुंबईत विश्रांती घेत असून दोन आठवड्यांनंतर ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे.

चित्रपटात रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत असून सोलापूर, सातारा आणि कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शूटिंग होणार आहे. विठाबाई नारायणगावकर यांना १९५७ आणि १९९० साली राष्ट्रपती पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.