बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

<p>बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल</p>

मुंबई – इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे मालक आणि डॉक्टर डॉ. अजय मुरडिया यांना चित्रपट बनवण्याचे आमिष दाखवणारे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
डॉ. अजय मुरडिया यांना दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ चित्रपट बनवण्याचं आश्वासन दिल्याने  विक्रम भट्ट यांना 31 मे 2024 रोजी 2.5 कोटी रुपये पाठवले. त्यानंतर, चार चित्रपटांचं आश्वासन देण्यात आले आणि तेव्हापासून  पैसे सतत हस्तांतरित करत राहिले. एकूण 30 कोटींहून अधिक रकमेचा अपहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  त्यामुळे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची अडचण वाढली आहे. 
या फसवणूक प्रकरणी भट्ट पती-पत्नीसह उदयपूर येथील दिनेश कटारिया यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.