अभिनेता आमिर खानची ‘ही’ केस पोलिसांनी केली बंद...
मुंबई - सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो काँग्रेस पक्षासाठी प्रचार करत असल्याचे दिसत होते. यानंतर आमिर खानच्या टीमकडून खार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. परंतु आता पुराव्या अभावी पोलिसांनी आमीर खानची ही केस बंद केली आहे.
'गुन्हा घडलाय पण संबंधितांविरोधात पुरावे न आढळल्यामुळे पोलिसांनी केस बंद करण्याचा निर्णय घेतलाय', असं म्हणत पोलिसांनी कोर्टात 'ए समरी' रिपोर्ट सादर केला आहे.