शिरडी के साईं बाबा' फेम दिग्गज अभिनेता गंभीर आजाराशी झुंजतोय...

कुटुंबीय करतायत मदतीचे आवाहन 

<p>शिरडी के साईं बाबा' फेम दिग्गज अभिनेता गंभीर आजाराशी झुंजतोय...</p>

मुंबई - 'शिरडी के साईं बाबा' फेम दिग्गज अभिनेते सुधीर दळवी यांचे वय 86 वर्ष आहे. सध्या ते सेप्सिससारखा गंभीर इन्फेक्शनच्या  आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर  मुंबईतील  लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अशा दुखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करावे लागत आहे. 1977 मध्ये आलेल्या 'शिरडी के साईं बाबा'मध्ये सुधीर दळवी यांनी साई बाबांची भूमिका साकारलेली होती. त्या काळात त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. अनेकजण त्यांनाच खरेखुरे साईबाबा समजू लागले होते.