ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन

<p>ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन</p>

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी ७४ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

आज दुपारी 2.30 वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून किडनी संबंधी आजाराशी झुंज देत होते. तसेच त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट देखील झाले होते.

त्यांची सारभाई vs साराभाई, जाने भी दो यारो आणि मै हू ना, हम आप के है कौन, हम साथ साथ है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कल हो ना हो, कभी हा कभी ना, ओम शांती ओम, कहो ना प्यार या सिनेमांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.